saru pawar

Others

3  

saru pawar

Others

कशाला उद्याची बात...

कशाला उद्याची बात...

3 mins
182


  आज आप्पा नानींना घेऊन बँकेत गेले.          तसे ते दोघंच म्हणून शक्य तेव्हा ते नानींना सोबत घेऊन फिरत.मुलं परदेशात स्थाईक. त्यांची आता परत यायची आशाच नाही.पुर्वी वर्षातनं ऐकदा तरी येणारी गेल्या चार वर्षात ऐकदाही इकडे फिरकली नाहीत.     मग दोघांचाच काय तो संसार ,राजाराणीचा म्हटला तरी हरकत नाही.कारण आप्पा राजा माणूस मनानं आणि दाणानंही.

आज आप्पा मनाशी काही तरी ठरऊनच बँकेत आले होते सगळ्या ठेवी ,पासबुक आणि लाँकरच्या किल्या वगैरे पण सोबत घेऊन.                     गाडीतनं उतरत राजारामला ,"तु गाडीतच थांब आम्ही आलोच दोघ जाऊन."

राजाराम ,"हो ...हो ठिक आहे .पण काही लागल तर मात्र फोन करा ."

आप्पा ,"हो ..हो ..करिन बर .तु तिकडे झाडाखाली गाडी लाऊन बस म्हणजे तापायची नाही.नाही तर तुझ्या नानीला चटके बसतात बाबा ." डोळे मिचकावत नानीनं कडे बघत दोघही गालात हसतात.

नानी हातात काठी नि पिशवी सांभाळत आप्पां च्या मागे चालु लागतात.

आप्पा पूर्वी पासुन बँकेचे ग्राहक नि आता काही दिवसां पासनं संचालक पण .मग त्यांना मँनेजर डायरेक्ट केबिन मधे बसायला बोलाऊन घेतात.

मँनेजर ,"आप्पा तुम्ही कशाला त्रास करून घेतलात मी कुणाला तरी पाठवल असत घरी.त्यात नानीनांही उगाचच घेऊन आलात ,गुडघेदुखी ने त्या आधीच बेजार ."

आप्पा ,"अरे दिपक दादा ,ऐरवी नव्हतोच आणत पण आज तिची सही लागणार आहे ,सही नाही कदाचित सह्या ,म्हणून आणल ..मग परत येणारच नाही कधी गरजच पडणार नाही कदाचित ."

मँनेजर ,"आप्पा अस का म्हणताय ?तुम्ही दोघ कुठे जाणार आहात का ?? दादां कडे अमेरीकेला ."

आप्पा ,"नाही अरे ,आता कसले तिकडे जातोय आपला गाव बरा नि आपलाच देश बरा.पण आता इथेही रहायच नाही .इहलोकीची यात्रा सुरू होण्या आधी नर्मदेची यात्रा करायची .त्यात वाचलो तर पुढे काशीत जाऊन रहायच अस ठरवलय."

मँनेजर ,"आप्पा !अस अचानक का ठरवल ? काही प्राब्लेम आहे का ?सांगा ना .नर्मदा परिक्रमा आणि काशी म्हणजे काय ? गावसोडून अस कुठेही का भटकायच आश्रीता सारख तरी का रहायच."

इतका वेळ फक्त हसुन संवादाचा भाग बनलेल्या नानी ,"आता तरी काय वेगळ आहे? घर आपल तरी आमचं प्रेमानं करणा-या सगळ्यांच्या आश्रयालाच तर राहतोय ,नात ना गोतं सगळी रक्ताशिवायची नाती पण त्यांना तरी अस किती दिवस बांधून ठेवणार ,अरे ति सुमन किती दिवस झाले लेक बोलवतोय तरी आमच्या मुळे ति जात नाही. शिवाय राजाराम ,बकुळा ,मनोहर सारीच दोन दिवस कुठे जायच म्हटल तरी आमच्या काळजीनं गेल्या पावली परत येतात.आमच झालय जगून ,आता आमची पोर नाहीतच अस समजून व्हायच ते देवाच्या नामस्मरणात आणि त्याच्याच दारात झाल तर मुक्ती ठरलेली.असेही पाश तोडलेत ,इच्छाही काही राहील्या नाहीत आता .इथे काय नि कुठे काय ? ऐकदाची देहाच्या पिंज-यातुन मुक्ती मिळाली कि संपल ..सार.."

मँनेजर ,"नानी ! अहो तुम्ही इतक निर्वाणिच का बोलताय ?तुम्ही तरी आप्पांना सांगायच पण तुम्ही सुध्दा ?"

नानी ,"हा निर्णय घ्यायचा आग्रह माझाच ,त्यांनी मला त्यात साथ दिली आणि त्यानां पटलय म्हणून आज ही त्या निर्णयाची पुढची पायरी ."

मँनेजर ,"म्हणजे ??"

आप्पा ,"फार काही नाही , जे आमच म्हणून वागवल ते आत्ता सगळ जिकडे तिकडे करायच .घर ,शेत आणि पैसा "

नानी ,"आणि दागिने पण .."

आप्पा ,"हो ..हो..दागिने पण !"

मँनेजर ,"म्हणजे नक्की काय करयाचय ?"

आप्पा ,"घर बकुळेच्या लेकीला शाळा चालवायला दयायच ,पैसा सुमन ,राजाराम ,मनोहर आणि बकुळेला .सगळे दागिने चौघांच्या लेकीनां आणि शेती ब्रम्हाकुमारीज संस्थेला ,ते ठरवतिल त्यांना काय करायच ते ."

मँनेजर ,"आणि तुम्ही तुमच्या साठी काहीच शिल्लक ठेवल नाही ."

आप्पा ,"अजुन असे किती दिवस जगू माहित नाही. पण हातात काही ठेऊन थोड्या सामाना सोबत आम्ही ऐकादशीला निघू ,नर्मदा परिक्रमेला पुढे जे होईल ते ."

नानी ,"आज !आत्ता ! या घडीचा भरवसा नाही.तिथे काशाला उद्याची बात ?नाही का हो ...

तो आहेच की आज पर्यंत सांभाळल आता परतिचा प्रवासही करवेन .."


Rate this content
Log in