Prashant Shinde

Children

0.4  

Prashant Shinde

Children

आज्ञाधारक मगर....!

आज्ञाधारक मगर....!

2 mins
16K


लहान मुलांचं विश्वं जेवढं लहान असतं तेवढंच ते महानही असतं. त्यांच्या कल्पना विश्वाचा विस्तार कितीही मोठा होऊ शकतो आणि कसाही असू शकतो. त्यांच्या कल्पनेला कशाचंच बंधन नाही आणि काय काय कल्पना त्या छोट्याशा मेंदूतून बाहेर पडतील याचा नेम नाही.गप्पा गोष्टींच्या ओघात त्यांची प्रगल्भता सहज डोकावते.

मी एकदा कट्यावर बसलेल्या लहान मुलांच्या गप्पा ऐकल्या. गप्पांच्या ओघात स्वप्नांवर गाड्या घसरल्या आणि एक एक गाडी आपली स्टेशन सोडू लागली. लांबच्या पल्ल्याच स्टेशन फेकू लागली. त्यातलंच एक स्टेशन मला नवल वाटण्यासारख वाटलं.

सानिका माझ्या मेव्हणीची मुलगी, वय तस लहान, चुणचुणीत, हसरी, नखरेल आणि थोडक्यात फटाकडी. मोठ्या तोऱ्यात आपलं स्वप्न रंगवून सांगू लागली. तिच्या निरीक्षण क्षमतेचा कौतुक करावे तितकं थोडंच. आपली आवडती आज्जी हेमा आज्जी हे अगदी मनावर पक्क कोरून ठेवलेलं. हेमा आज्जी म्हणजे कोणत्याही क्षणी कोणालाही मान, अपमान, भीडबाड न बाळगता आपलंच समजून काम सांगणार मशिन अशी तिच्या मनाची धारणा. अशा पार्श्वभूमीवर ती आपलं स्वप्नं सांगू लागली. आजऱ्यातली कट्ट्यावरची संध्याकाळ थोडा अंधार दात पडलेला आणि बोळाच्या तोंडाला भली मोठी मगर आली. आम्ही सगळे तिला फायलाब गेलो. पहाता पहाता तिची नजर माझ्यावर गेली आणि ती मगर माझ्याकडे डोळे टवकारून पाहू लागली. आणि काय मती फिरली देव जाणे ती माझ्या मागे लागली. मी पुढे जीव मुठीत घेऊन पळत घराकडे धूम ठोकली तशी ती ही जोरात पळत पळत मागोमाग आली. मी पटकन दरवाजाचा आडोसा घेतला तशी ती तडक हेमा आज्जीच्या मागे स्वयंपाक घरात जाऊन चुली जवळ उभारली. हेमा आज्जी भाकऱ्या करीत होती. तिला चाहूल लागली तशी तीन मागे वाकून पाहिलं तर ही भली मोठ्ठी मगर पुढचे दोन पाय वर करून मागच्या दोन पायावर उभी. आज्जी आमची खूप प्रसंगावधानी आणि धाडसी. तिला मगरीचे काहीच कौतुक वाटले नाही आणि तिने सहज लीलया हुकूम सोडला, जा म्हणाली मगरीला, परड्यातली चार लाकडी घेऊन ये..! मी पहातच राहिले आज्ञाधारक मगर मुकाट्याने लाजड आणायला पररड्यात गेली आणि मी जागी झाले..!

काय ग बाई असली मगर मी कधी पाहिली नव्हती पण आज्जीच मला खूप कौतुक वाटलं आणि पटलं आमची हेमा आज्जी काहीही करू शकते याची खात्री पटली...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Children