आई अन्नपूर्णेचे रुप असते
आई अन्नपूर्णेचे रुप असते
मीनाताई चहाचं कढान ठेवता ठेवता बोलत होत्या, अगदी नाराजीच्या सुरात, "काय हो आज पुन्हा तुम्ही कोथिंबीर आणायचं विसरलात ना! हे तर तुमचं नेहमीच झालंय. बंडू काका खजील होऊन बायकोच ऐकून घेत होतें. बाकी ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांच्याकडे. शेवटी विसरभोळेपणा ते तरी काय करणार?
मीनाताई, "आज एवढ्या दिवसांनी पोरगं येणार होतं. त्याला फार आवडतात हो कोथिंबीरच्या वड्या पण तुम्ही आज घोळ घालून ठेवलात. चहाचा कप मीनाताई नवऱ्याला देत म्हणाल्या.
सुरज मीनाताईचा एकुलता एक मुलगा शिकायला परदेशात गेलेला दोन वर्षांनी येणार होता.
मीनाताई, "जाऊद्या तुमच्याशी कशाला वाद घालत बसले. मीच जाऊन आणते लगेच. त्यानीं बाहेर पडण्यासाठी दाराची कढी उघडली आणि पाहतात तर काय दारावर कोथिंबीरीची पेंडी घेऊन सुमन भाजीवाली आली होती. तिला पाहाताच सोनं दिसावं तसा त्यांचा चेहरा खुलला. आज बरोबर वेळेत आलीस सुमन. अगदी माझ्या मनातला ऐकून.
सुमन, मीनाताईना बघून हसत म्हणाली काय घेयचा होत आज माझी आठवण आली?आज मुलगा येणार आहे माझा सुरज. तेही दोन वर्षांनी त्याला कोथिंबीरच्या वड्या खूप आवडतात गं आणि त्यानं फोन करून करायला सांगितल्या आहेत.पोराचं मन मारू वाटत नाही गं. बाजारातच चालले होतें. तू दिसलीस समोर. म्हातारीला एवढं चालणं होतंय का आता? तू दिसलीस आणि बरं वाटलं.
सुमन, किती देऊ बरं सांगा कोथिंबीरच्या पेंडया?ताजा माल आहे ताई!
मीनाताई,"दोन दे बघ!"
मीनाताई हिरवीगार कोथिंबीर पेंड्या घेऊन घरी आल्या. त्याचं मन अगदी खुश होऊन गेलं. मनासारखी कोथिंबीरही मिळाली होती.
हे बघा मिळाली कोथिंबीर असं नवऱ्याला म्हणत किचनकडे गेल्या.
आज त्यांनी पंचंपक्वनाचा थाट घातला होता. स्वयंपाक अगदी आनंदाने गाणं गुणगुणत चालला होता.
तोपर्यंत बंडू काका किचनमध्ये आले. मुलगा येणार म्हंटल की आजचा थाट वेगळाच आहे. आम्ही काय पाप केलंय काय माहित? आमच्यासाठी तर फक्त शब्दांचा भडीमार.
"अहो एवढं नका मनावर घेऊ.रोज तर तुमच्यासाठी करतच असते. सुरज येणार म्हणलं की मन हळवं होत हो. एकतर दोघांपासून लांब त्यात काय खातोय तिकडे? चांगलं तर खात असेल ना?असे विचार मनात घर करतात. लग्न झालं की आपण कशाला त्याची एवढी काळजी करू.
बंडू काका, बरोबर आहे तुझं मीना! आता लग्नासाठी मुलगी बघायला सुरुवात करूयात. "का त्याला कोणी आवडते ते विचारू?
दुपारच्या दोन वाजता सुरज घरी परतला. आईबाबाना एवढ्या दिवसांनी बघून त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. मीनाताई पण हळव्या झाल्या.
दुपारचं जेवण पाहून त्याची भूक तर प्रचंड उसळली. "काय ते ताट!
कुर्मा पुरी, बटाटा वांग्याची रस्सा भाजी, कढी, मसालेभात, शेवयाची खीर,कोथिंबीरीची वडी, आहाहा! ताट पाहूनच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मीनाताई वाढत असतानाच त्याने खमंग कोथिंबीरीची वडी घेऊन खायला सुरुवात केली. प्रत्येक भाजीत कोथिंबीरचा वापर भुरभूरण्यासाठी केला होता. जेवणाचं ताट कोथिंबीरशिवाय अपूर्णच. सगळे मिळून जेवायला बसले.
सुरज खूप दिवसांनी जेवण मिळाल्यासारखं ताटावर तुटून पडला होता. मीनाताई त्याच्याकडे कौतुकाने पाहत होत्या.सुरज आवडीने जेवताना पाहून मीनाताईचं पोट आणि मनही भरलं होत. शेवटी आईच काळीज मुलं पोटभर जेवले की आई तृप्त होऊन जाते!!
प्रत्येक आई घरातील अन्नपूर्णा देवीचे रुपच असते.
लेख आवडल्यास लाईक, कमेंट,करायला विसरू नका. तुमचा अभिप्राय मोलाचा आहे.
समाप्त
