आदर्श
आदर्श
एका शेतकयाच्या परिवारात दोन भाउ आणी तीन बहिनी होत्या. वडिल शेतकरी असुन सुध्दा, आपण नाही शिकु शकलो, म्हणुन आपल्या मुलांना त्यांनी शिक्षण देण्याचा निर्धार केला होता.ही शेतक-याची दूरदृष्टिच म्हनावी.ज्या काळ्यात शिक्षणाच महत्व शेतक-याला नव्हतं. शेति ही निसर्गाने त्याला दिलेली संपत्ती भेट असा त्यांची विचारधारा पीढ्यानु- पीढ्या पासुन सारखी अखंड गंगेच्या प्रवाह प्रमाने संचारित होती. खायला कोंडा अन झोपायला धोंडा, अशी परिस्थिति असतांनाही त्यांनी केलेला निर्धार आपल्या जीवणात पूर्णे केला होता.घरातील मोठे बंधुच्या मागो-माग लहान पण शिकले होते.मुली पण शालांत परिक्षा पास झाल्या होत्या. मोठे बंधु कॉलेजला प्राध्यापक झाले होते.लहान पण कनिष्ठ विद्यालयाला प्राध्यापक झाले.वडिल भाउनी एक महिला प्राध्यापिका सोबत लग्न केले होते. दोघेही सुखी संसाराचा आनंदा घेत होते. सगळ काही असतांना त्यांना प्रकृतिने निःसतान ठेवले होते. त्यांनी इतर पुरुषा प्रमाने दुसरे लग्न वैगरे न करता एक धाडसी निर्णय घेतला होता. आपण अनाथ आश्रमातील मुलीला दत्तक घेवुन तीला आपल्या मुली सारखे वाढवायचे ठरविले होते. ते मुलाला पण दत्तक घेवु शकले असते.त्यामुळे त्यांचा वंश रिती-रिवाजा प्रमाने समोर वाढत राहिला असता. ते आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या मुला-मुली पैकी कोणाला ही दत्तक घेवु शकले असते.पण त्यांनी समाजा समोर एक आदर्श ठेवावयाचा होता. ज्या समाजत मुलीचे हुंड्या साठी हत्या करण्यात येते, सगळी कडे जातीचे, उच-निचतेचे वातावरण आहे. अशा समाजत पण काही समाज चिंतक लोक असतात.जे प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जावुन कार्य करुन समाजा समोर आदर्श ठेवतात. त्यांनी असा आदर्श समाजात ठेवला होता. पण त्याच्या कुटुंबातील भाऊ, बहिन, साळी व अन्य कोणीही त्याचा विरोध केला नाही. ज्या समाजात थोड्याशा संपत्ती साठी वाद-विवाद होतात. त्याच समाजात अशे ही काही परिवार असतात. जे आदर्श स्थापनेसाठी आपले समर्थन देत असतात. वास्तविक पाहता विधवा बहिन किंवा भावाने संपत्ती साठी या आदर्शाचा विरोध करने स्वाभाविक होते.
घरातील सगळ्यांचे लग्न वैगरे झाले होते. मध्ये बहिणींचे लग्नाला थोडा उशिर झाल्याने कनिष्ठ मुलाचे ल्ग्नाला उशिर झाला होता.तरी मुलाला एक चांगले स्थ्ळ आले होते. त्यांनी पन पसंदी दाखवली होती. घरी काळाप्रमने मुलींच्या आईकडील आजोबांनी हा प्रस्ताव आणला होत. सर्व काही व्यवस्थित होते. फ्क्त मुलाच्या व मुलीच्या वया मध्ये सामान्य पेक्षा जास्त अंतर होते. घरातील व नातेवाईकातील वडिल मंडळीने या बाबी कडे दुर्लाक्ष केले होते.मुलीचा व परिवारातील अन्य सदस्यांचा जास्त प्रतिसाद या विवाहाला नव्हता.
घरचे झाले थोडे अन व्यहांनी पाठवले घोडे, मध्यंतरी तीच्या वर्गातील एका मुलाला तीच्या लग्नाविषयी माहिती मिळाली होती. एकाच वर्गात असल्यामुळे कदाचित त्यांचे सहज मुलीशी बोल-चाल असावी. मुलगी फार सुंदर असल्यामुळे त्याचे तीच्या सोबत एक तरफा प्रेम असावे.तरुण वयात एक तर्फा प्रेम हे प्राकृतिक नियमा मध्ये सहज शक्य असते. काही मुल-मुली याला फार गंभीरतेने घेतात. त्या मुलाने नवरदेव होणा-या मुलाचा शोध घेतला होता. आणी त्या मुलाच्या वडिल भावाला सांगितले की माझे त्या मुलीवर प्रेम आहे.तीचे पण माझ्या वर आहे. आपण हा संबंध किंवा ही सोयरिक नाही करावी. त्यामुळे प्रसंग अटितटीचा झाला होता. वडिल भाऊ प्राध्यापक असल्यामुळे त्यांना अशा कॉलेज मधील अपरिपक्व प्रेमा सबंधाची चांगली माहिती होती. हे सर्व प्रेम प्रकरणे एकतरफा असतात याची त्यांना जानीव होती. तर एक वेळेस चौकशीकरुन घ्यावी असा त्यांचा कयास होता.
मुलाचा मोठा भाऊ आणी मुलगा याची चौकशी करण्यासाठी मुलीच्या मोठ्या वडिलांना भेटले. प्रकरना विषयी चर्चा केली. मुलीच्या मोठ्या वडिलांना असा काही प्रकार नसल्याचे सांगितले होते. त्यांना त्यांनी आपण तशि चौकशी करावी असे म्हटले होते. आमची काही हरकत नाही.फ्क्त मुलीची विनाकारण समाजात बदनामी होवु नये याची दक्षता घ्यावी. कदाचित त्यांनी तशि चौकशी वैगरे केली असावी.नंतर त्यांनी लग्नाला होकार दिला होता. लग्न वैगरे झाले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.मुलगी इंजिनिअर झाली व मुलगा सी. ए. करत आहे.त्यांच्या पत्निला पाठीच्या कनाचा त्रास सुरु झाला. तीचा इलाज सुरु आहे. कसले काय अन फाटक्यात पाय.
सगळ काही साधारण व्यवस्थित सुरु असतांना त्यांची एक बहिन मोटरसायकल अपघात विधवा झाली होते. तीचे पति रोड अपघात मरन पावले होते. त्यामुळे मुलीच्या लग्नाची जवाबदारी दोन्ही मामा वरच होती. दोन्ही मामा तसे सामाजिक होते. पण लहान मामा जास्तच सामाजिक असल्यामुळे त्यांचे संबंध सर्वांहशीच प्रेमाचे व घनिष्ठ होते. ते आपल्या भाचीच्या लग्नात व्यस्त होते. लग्नाला नेमके तीन-चार दिवस राहिले होते. म्हणुन आपन आधी जावुन सगळी व्यवस्था एकदा नीट बघुन घ्यावी . म्हणुन मोटर सायकलने सकाळी निघाले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळच्या वेळेस हलकेसे धुके होते. ठोडी दृष्टता कमी होती. एका वळणावर एका ट्रक वाल्यांने त्यांना धडक मारली. व तो सरळ निघुन गेला होता . दोघेही कदाचित वळणार वर धुके असल्यामुळे एक-मेकांना बघु शकले नसावे.अपघाती खाली कोसळुन गडयात पडले होते. फार मोठा अपघात झाला होता.ते येणा-या-जाणा-यला गड्यात असल्यामुळे दिसत नव्हते. अचानक घरच्या मुलाने बाबा पोहचले की नाही म्हनुन चौकशी करण्यासाठी फोन लावत होता. पण ते वेहोश होते. अशिच सारखी घंटी वाजत राहत् होती. त्यामुळे मुलगा वारमवार फोन लावत होता. मोबाईलच्या घंटीच्या आवाजने रस्ताने जाना-या दोन जागृत युवकांनी ऐकला होता. त्यांना कोणी दिसत नव्हते. ते गाडी थांबवुन आवाजाच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांनी अपघात्याला बगितले. जिथुन सारखे कॉलस येत होते. त्या नंबर वर फोन केला होता. त्याने अपघात झाल्याचे वृत दिले होते.व सांगितले की मी ऑटो करुन यांना पढ्च्या शहरातील दवाखान्यात पाठवित आहे. डोकल्या मार न लागल्यामुळे ते थोडे शुध्दिवर आले होते. स्थानिय उपचारा नंतर त्यांना त्यांच्या संबंधीतांनी जिल्हाच्या मोठ्या दवाखान्यात भरती केले. त्यांचा एक उजवा पाय जवल-जवळ क्षतीग्रस्त झाला होत. कदाचित वाहानाने उजव्या बाजुनी धडक दिली होती.दवाखाण्यात उपचार सुरु झाला होता. त्यामुळे जीवाचा ढोका टळला होता. पाया मधे स्टील रॉड टाकण्यात आला होता. जवक-जवळ तो गृहस्थ सहा महिने कड पलटु शकला नाही. तबल सहा महीने पाठीच्या आधरावर होते. त्याच अवस्थेत सगळ्या शाररिक गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या.मरता क्या न करता.हे सगळ सारख सहन करावे लगत होते.
हे सर्व पार पाडण्यात त्यांच्या अर्धागिंणीचा आजारी असतांना सिंहाचा वाटा होता. सोबत त्यांची साळी व साड भाऊचे योगदान पण सराहनिय होते. ते त्याच शहरात राहत असल्या मुळे त्यांना त्यांचे सहकार्य लाभले होते. दवाखाण्यातुन सुट्टी झाल्यानंतर त्यांचे पूर्ण वास्तव्य त्यांच्या घरी होते. या सर्वांच्या सहका-यामुळे त्यांना नैतिक बळ मिळत होते. अपघात फार मोठा झाला होता. त्यामुळे वेल लागने रास्त होते. प्रकृतिने फार मोठा अपघात होता-होता वाचविला होता.जर त्यांना इतका भयंकर मार डोक्याला लागला असता .तर काय झाले असते याची कल्पना पण करनेच चुकिचे आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
त्यामुळे मोठे संकट टळले होते.जर असे झाले असते, तर त्या कुटुंबा वर कशे दिवस आले असते.हे सगळ्यांनाच समोरदिसत होते.
अर्धांगिनीने कसलीही तकार न करता अहोरात्र आपल्या पतिची आद्य कर्तव्य म्हणुन पत्नी धर्म निभवला होता. तीच्या सोबत त्यांच्या साडभाऊ व साळीचे पण योगदान आहे, ते तबल चार ते सहा महिने त्यांच्या कडेच होते. दोन-तीन ऑपरेशन नंतर ते बसु लागले होते. सध्या काडीच्या मदतीने फिरतात. विज्ञानाचा फायदा मनुष्याला वेळ, श्रम, सुख, ऐश्र्वर्य भोगण्यासाठी होत आहे. पण असे काही घडले म्हनजे मनाला वाटते ,विज्ञानाच्या विकासाने माणसाचे जिवन जीत के सुखदाई झाले त्याच्या पेक्षा ते जास्त असुरक्षीत, अनिश्चित नक्कीच झाले आहे.म्हणुन ,देव तारी, त्याला कोण मारी. असे म्हनावे लागते.
