STORYMIRROR

Krishna Shuchi

Abstract Horror Tragedy

3  

Krishna Shuchi

Abstract Horror Tragedy

अ. ल. भयकथा: ९. एकांत

अ. ल. भयकथा: ९. एकांत

1 min
18

रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. मृदुला तिच्या नवऱ्याची, आकाशची वाट पाहून पाहून थकली होती. बसल्या जागी तिचा डोळा लागणार तेवढयात दाराची बेल वाजली. दार उघडायला जाणार तेवढ्यात किल्लीनेच दार उघडून खुद्द आकाश आत आला. चेहेरा मलूल पडलेला, डोळे निस्तेज झालेले, कपडे मळलेले.. अवतारावरून दिसत होतं की आज त्याचा दिवस खूप धकाधकीचा गेला होता. बॅग, चावी अस्ताव्यस्त फेकून दिली अन् त्याने सोफ्यावर धाडकन अंग टाकून दिलं. श्रमांनी म्लान झालेल्या त्याच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. भिंतीवर टांगलेल्या मृदुलाच्या फोटोकडे पाहून तो म्हणाला, "मन्नू, का सोडून गं गेलीस मला.. तुझ्याशिवाय या जगात मी एकट्याने कसं जगू ?..."


***

समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract