STORYMIRROR

Krishna Shuchi

Drama Horror Thriller

3  

Krishna Shuchi

Drama Horror Thriller

अ. ल. भयकथा: ८. ॲली ऑफ रिमोर्स

अ. ल. भयकथा: ८. ॲली ऑफ रिमोर्स

1 min
23

प्रार्थना संपवून फादर स्टीफन्स चर्चच्या बाहेर पडले अन् शेजारील निर्मनुष्य अश्या, अरुंद आळीत शिरले. अचानक मागून येणाऱ्या एका मवाल्याचा त्यांना धक्का लागला. पुढे जाऊन तो मवाली गपकन जागीच थांबला. त्याच्या डोळ्यांत प्रचंड भीती होती. कसंबसं फादरकडे वळून तो जोरात ओरडला..

"अरे म्हाताऱ्या, तुझा खून पाडून दोन वर्ष झाली तरी अजूनही मला दिसतोस! का ? माझी पाठ सोड बाबा.! जाऊदे मला..", असे म्हणून तो मवाली सुसाट वेगात पळून गेला. फादर स्टीफन्स मात्र तो गेला त्या दिशेने मंद हास्य करत बघत राहिले.. त्या आळीला नाव होतं-

'ॲली ऑफ रिमोर्स'..


***

समाप्त

(रिमोर्स: पश्चाताप)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama