STORYMIRROR

Krishna Shuchi

Horror

2  

Krishna Shuchi

Horror

अ. ल. भयकथा: १०. अवसेचा घाट

अ. ल. भयकथा: १०. अवसेचा घाट

1 min
21

अजयची बाईक रात्रीच्या वेळी त्या सूनसान घाटातून सुसाट धावत होती. काहीवेळाने थोड्या अंतरावर त्याला एक म्हातारा अन् नात चालतांना दिसले. जडबदक पोतं अन् सोबत लहान मुलगी असणाऱ्या त्या म्हाताऱ्याकडे पाहत अजयने बाईक त्यांच्यापाशी थांबवली.

"काय आजोबा, कुठं जायचं तुम्हाला?", त्याने विचारलं. अजयला बघून म्हाताऱ्याचे डोळे भीतीने पांढरेफटक पडले. झटकन नातीला खेचून त्याने मागच्या झाडीत धाव घेतली. पळता पळता धाप लागलेला म्हातारा थरथरत आपल्या नातीला म्हणाला,

"धाव पोरी धाव, त्यो गाडीवाला केव्हाच अपघात होऊन मेलाय.. तीन बरस झाली, लोकास्नी त्याचं भूत अवसेच्या रातीला या घाटात दिसतं..!"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror