STORYMIRROR

Krishna Shuchi

Horror Thriller Children

3  

Krishna Shuchi

Horror Thriller Children

अ. ल. भयकथा: ७. कोण असेल ?

अ. ल. भयकथा: ७. कोण असेल ?

1 min
17

रात्री अकराच्या दरम्यान मीना बाथरुमला गेली. पाण्याचा नळ चालू करणाऱ्या तिचे हात अचानक थांबले कारण हॉलमधून कुणाच्या तरी बडबडीचा तो आवाज पुन्हा तिला ऐकायला आला होता. मीना दचकली!

"कोण असेल?", घाबरून ती स्वतःशी म्हणाली.

इकडे हॉलमध्ये अंधार करून सोफ्यावर बसलेली वैशाली अन् तिला घट्ट बिलगून टिव्ही पाहणारी सुमेधा पुन्हा आलेल्या त्या आवाजाने दचकल्या! थरथरत्या आवाजात सुमेधा आईला म्हणाली,

"आई, बाथरूममधून परत पाण्याचा तो आवाज! तेही घरात आपण दोघीच असतांना.."

"कोण असेल?", घाबरलेली वैशाली स्वतःशी म्हणाली.


***

समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror