STORYMIRROR

Krishna Shuchi

Horror Crime Thriller

3  

Krishna Shuchi

Horror Crime Thriller

अ. ल. भयकथा: ११. बिडी-काडी

अ. ल. भयकथा: ११. बिडी-काडी

1 min
18

अवसेच्या किर्र अंधाऱ्या रात्री, एका स्मशानाबाहेर रघू अण्णा निवांत उभा होता. तेवढयात कुंपणावरून उडी घेऊन धावत येत, पडत-धडपडत, धाप लागलेली दोन तरुण पोरं त्याला पाहून त्याच्याजवळ थांबली..

"बाबा, इथून आत्ताच्या आत्ता पळा, स्वतःचा जीव वाचवा! तिथं आत, स्मशानात, काही गुंड एका माणसाचा मुडदा पुरत आहेत.! आम्ही दोघं आलो होतो दारू प्यायला पण आम्हीच कसेबसे सटकलोय..", त्यातला एक तरुण घाबरून म्हणाला.

रघू अण्णा किंचित हसला.. म्हणाला,

"आसं होय, त्यास्नी म्हनाव पुरतांना यखादी बिडी-काडी तरी सोबत पुरा! च्या मारी.. नुस्तंच हुबं राऊन लय कटाळा येईल मला..."


***

समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror