19...शक्तिमान...
19...शक्तिमान...
आवडते सुपर हिरो खूप पाहिले,पण ज्या सुपर हिरोने माझ्या बाळ मनावर थोड्याबहुत प्रमाणात राज्य केले तो म्हणजे शक्तिमान. मुकेश खन्ना ने तो टीव्ही मालिकेत साकारला होता. आमच्या टीव्ही च्या पहिल्या काळात तो आमच्या पाहण्या शक्तिमान मालिकेच्या रूपाने आला आणि आमचे बालपण मजेत गेले, समृद्धही झाले. इतर सुपर हिरो कधी तसे पाहण्यात आले नाहीत कारण एकत्र ग्रामीण भागातले वास्तव्य आणि प्रसार माध्यमापासून थोडे दूर, त्यात इंग्रजीचा दुष्काळ. सारे कसे सोशल टिस्टन्स ठेवूनच आमचे बालपण सरके.आता मागे वळून पाहताना तो काळ खूप आनंद देतो आणि शक्तिमानची आठवण थोडा आणखीनच आनंद द्विगुणित करतो. त्यामुळे शक्तिमान जेवढा तेंव्हा आवडत होता तेवढाच आताही आवडतो कारण तो मला माझे बालपण परत देतो...
शक्तिमान वसे त्या काळी
जळी कष्टी पाषाणी
दैवत होते ते माझे
अल्लड आनंदी आशा बालपणी
सरके शैशवं तारुण्य ही सरले
आले जरी वार्धक्य उंबऱ्यावरी
शक्तीमानतो शक्ती देतो पुन्हा
नुसती आठवण त्याची काढल्यावरी...
