STORYMIRROR

AkshRahi world विजयसुत

Inspirational

3  

AkshRahi world विजयसुत

Inspirational

यशमार्गाच्या शोधात

यशमार्गाच्या शोधात

1 min
150

पाहिलेली स्वप्न निर्जीव होऊन अशीच डोळ्यात थिजली तर..???

या शंकेचा विद्रुप चेहरा हल्ली घाबरवतो

माझ्या मनाच्या निरागस बालकाला

मीही एका जागी खिळून भेदरलेल्या अवस्थेत

"मनोमन धावत सुटतो यशमार्गाच्या शोधात..."

डोळ्यांच्या सीमेत मावणारे

अनेक रस्ते दिसतात समोर..

स्वप्नपूर्तीच्या अश्वावर रुढ होऊन,

निवडतो मी एक कच्ची वाट

त्या उज्वल भविष्याकडे नेणारी...


वाट सत्वपरीक्षांच नागमोडी वळण घेत

माझ्या सकारात्मक मेंदूने शरीराभोवती गुंडाळलेल्या धैर्यकवचाला

भेदण्यासाठी आसुसलेल्या असूयेच्या

काटेरी झुडपांच्या कुशीतूनच जाते..

मनाच्या वारुळातून नकारात्मकतेचे भुजंग फुत्कारत, वळवळत बाहेर पडतात...


प्रयत्नांच्या अश्वाचे वेग घट्ट धरून

आत्मविश्वासाच्या खुरांखाली मीही

न्यूनगंडाचे भुजंग ठेचाळतो..

न खचता पुढच्या प्रवासाला सज्ज होतो...


वाटेत भेटतात उलट्या पायांची माणसं

त्यांचा प्रवासही असतो उलटा..

राजमार्गाकडून अंधकाराकडे जाणारा

वाटेत भेटेल जो त्यालाही मोहुन सोबत नेणारा...


अर्थातच मलाही भेटली..

लक्ष्यापासून मागे ओढणारी

उलट्या पायाची राक्षसी पिलावळं...


हीन वृत्तीने झाकोळलेल्या त्यांच्या ढगांचं, नव्हे-नव्हे

तर त्यांचंच पोट फाढून..

पलीकडे असणाऱ्या तळपत्या सूर्याला

नेत्राने आलिंगन देऊन,

सर्वांगाचे नेत्र करून

पिऊ लागलो काळोखावर मात करणाऱ्या कर्णपित्याची ऊर्जा...


अंगी एक वेगळीच शक्ती जन्मली

आता माझ्यात मी नसून, होतो फक्त

यश प्राप्तीसाठी वेडा झालेला एक योद्धा..

सर्व शंकांचे विद्रूप अलंकार लगोलग पिघळून गळून पडले

अगदी केविलवाण्या रूपात...

मनोमन नाही तर आता खरोखर

धावत सुटलो यशमार्गाच्या शोधात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational