STORYMIRROR

AkshRahi world विजयसुत

Inspirational

3  

AkshRahi world विजयसुत

Inspirational

महिला दिन विशेष कविता

महिला दिन विशेष कविता

1 min
903

कधी तू आग व्हावे ; 

होऊनी आग निखारे कुशीत घ्यावे..

कधी व्हावेस तू पाणी ; 

होऊनी तोय भुवनीस जीवन द्यावे..


कधी हे तुझे अनिल रूप ; 

संथ कधी तर कधी रौद्र खूप..

मज वाटे कधी तू गिरिशिखर तो व्हावा ; 

ताठ कणा तुझा तो दुरुनी दिसावा..


कधी तुझ्या मनी न कुठली तमा उरावी ;

तुझ्याच ठायी तर कधी मजला स्वप्ननगरी दिसावी..

एक जन्म एक जीवन तू न कधी एक राहावे ;

विवेक छाटलेल्या या दुनियेत बहुआयामी तुझे स्वरूप असावे..


परकं धन तू कन्या जन्मली  

न मनी कधी तू हा विचार धरावा.. 

होऊनिया स्वार तू या प्रगत रथावर

प्रगतीच्या वाटेवर अविरत प्रवास करावा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational