STORYMIRROR

AkshRahi world विजयसुत

Others

3  

AkshRahi world विजयसुत

Others

पोट कधी भरलंच नाही

पोट कधी भरलंच नाही

1 min
243

भूक जेव्हा पोटातील आतड्यांना खाऊ लागते

तेव्हा तुमचा कट्टरवाद तुम्ही देता आम्हाला चघळायला

आम्ही तो चघळतो, पोट मात्र भरत नाही..

भरतो आमचा मेंदू द्वेषाने.!


आमचे ओठ सुकतात, दाताच पाणी आम्ही गिळू लागतो

भूक अजुनच उंचबळून येते पोटाला खळगा पडतो

आम्ही लाचार मुळीच नसतो

पण तरीही पसरतो तुमच्यापुढे हात

तुम्ही हसत हसत हातामध्ये आमच्या शस्त्र ठेवतात

धर्म धोक्यात आहे सांगून काफिरांची मुंडकी छाट म्हणतात

दोन चार जणांची मुंडकी आम्ही उतरवून बघतोही

पण पोट मात्र भरत नाही..

भरतात आमचे हात रक्ताने.!


हळू हळू आमची भूक नाहीशी होऊन जाते

हातावरील माखलेल्या रक्ताने पोटातील आतडी ताजी होऊ लागतात

आमचे सुकलेले ओठ असुरी दातांना

गळा फोडण्यासाठी प्रवृत्त करतात

हळूहळू आम्ही असुर बनत जातो..

आमचा वध केला जातो, आमच्या देहाची चिरफाड होते

आमच्या पोटातून भुकेचा गोळा बाहेर पडतो

आमचं पोट कधी भरलेलं नसतच.!


आम्ही परलोकात जातो आमच्या लेकरांना मागे ठेवून

तुम्ही पुढे येतात त्यांच्याही हातामध्ये शस्त्र ठेवायला.!!


Rate this content
Log in