STORYMIRROR

AkshRahi world विजयसुत

Romance

3  

AkshRahi world विजयसुत

Romance

सौंदर्यवती

सौंदर्यवती

1 min
1.0K

सौंदर्याची तुझ्या स्तुती नाही खोटी, बघ ही खरी

दिसतेस स्वर्गातील अप्सरा अन् तू नभातली परी

चांदणी शुक्राची शोभली कपाळी, कांती चंद्राची चेहऱ्यावरी

लावण्य सुंदरी नाजूक हसरी, जणू तू फुलाची कळी

नयन हे रम्य जणू शांत सागर त्यात पसरला

ओठ गुलाबाची पाकळी, त्यावरी मादक तीळ तो सजला

बोल हे मधाळ तुझे, भाळती तुजवर सारे

नजरेत या तीर जणू निखळती अवकाशातील तारे

केश हे तुझे की जणू रेशमाचे जाळे

स्पर्श तुझा लाजरा आणतो अलगद अंगावरी शहारेेे

कांचनमृग हा प्रिये जणू तुझ्या रुपी मी पाहिला

सौंदर्यवती तू तुज पाहता विजयसुत स्तब्ध राहिला


© अक्षय शिंदे ( विजयसुत )









Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance