STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

योगाची साथ

योगाची साथ

1 min
463

आयुष्याच्या वाटेवर या

साथ धरू या योगाची

उत्तम आरोग्य हीच खरी दौलत

मिळेल साथ धरुनी योगाची

नसेल चिंता उद्याची.. नसेल चिंता उद्याची


मनस्वाथ्य जपण्यासाठी

रामबाण साथ ही योगाची

सूर्यनमस्कार आणि आसने विविध

पद्धत खास ही योगाची

नसेल चिंता उद्याची... नसेल चिंता उद्याची


प्रणवोच्चार आणि प्राणायाम

देणगी हीच योगाची

भारतीयांची ही योग परंपरा

शान राखुया योगाची

नसेल चिंता उद्याची... नसेल चिंता उद्याची


चला सर्व मिळुनी करू या पण

साथ धरूया योगाची

नसेल चिंता उद्याची.. नसेल चिंता उद्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational