येऊ का मी... (गझल)
येऊ का मी... (गझल)
सांग ना तूच मनात तुझ्या येऊ का मी ?
भाव प्रितीचे बोलण्यास येऊ का मी ?
गूज मनीचे व्यक्त करण्या येऊ का मी ?
साथ तुझी निभावण्यास येऊ का मी ?
बंध प्रेमाचे छान जपण्या येऊ का मी ?
तुला आनंद देण्यास सांग येऊ का मी ?
अलगद तुझे दुःख वाटण्या येऊ का मी ?
क्षण प्रेमाचे हे फुलवण्यास येऊ का मी ?
तुझे सर्व छंद जोपासण्या येऊ का मी ?
तुझ्या कुशीत पहुडन्यास येऊ का मी ?
हट्ट तुझ्याकडे करण्या सांग येऊ का मी ?
हळूच लटकेच रागावण्यास येऊ का मी ?
एकरूप मग तुझ्याशी होण्या येऊ का मी ?
जीवनात तुझ्या रंग भरण्यास येऊ का मी ?

