STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

या वळणावर

या वळणावर

1 min
276

मनपटलावर उगवते जेव्हा

आशेची नवी पहाट 

उमटते दररोज 

जगण्याची नवी वाट


स्वप्न बदलते सुर

बेसुरता येई जीवनाला

अनुभव येई भेटीला मग 

अगदी धावून मदतीला


या वळणांवर 

जोम जोमाने चढतो 

वाढूनी महत्त्वकांक्षा  

जिणं नवं सावरतो 


गाऊन दुःखाचे गाणे 

मनीचा आनंद हिरावतो

मग धागा संपत येते 

अन् क्षण चिंतनाचा येतो


जगलो किती, भिऊन या मरणाला 

जगण्याची हाव केली प्रत्येक घडीला 

पण सोडुनी माणुसकी, वैर जेव्हा जपलो 

तेव्हा जीवनाला, अर्थ उरला नव्हता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract