STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

व्यथा मनामनांच्या...पूरग्रस्त

व्यथा मनामनांच्या...पूरग्रस्त

1 min
11.9K

अवकृपा वरुणाची होता

संतत होई जलथैमान

ढगफूटीच म्हणे वर्षावा

पूरग्रस्त हो अधोवदन (1)


घर कसले ते चंद्रमौळी

खचले कसे जलवर्षावे

आडव्यातिडव्या जलधारा

चहूबाजूंनी झोपडी गळे (2)


कष्टाने संसार जमविला

चिमटा पोटालागी घेऊनी

मुले लागली आता शिकाया

अवचित विस्फोट करणी (3)


धपापले उर धसक्याने

पूर लोटला घरांघरांत

गेलो टाकूनी सारे धावत

दुर्दैवी पुरासवे वाहात (4)


नकोच शाब्दिक अनुकंपा

आता सक्रिय साहाय्य हवे

मानवता अंतरी जागवा

दुःख पूरग्रस्तांचे जाणावे (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy