STORYMIRROR

Smita Doshi

Tragedy

4  

Smita Doshi

Tragedy

व्यसन

व्यसन

1 min
358

जिथे गुदमरते माणसाचे श्वसन

असे असते हे जीवघेणे व्यसन

कशाला हवे असले जीवघेणे व्यसन

अरे,व्यसन।व्यसन।व्यसन।


दारू,गुटका,सिगारेटचे व्यसन

जे करते सर्वांचे बरबाद जीवन

असे व्यसन काय कामाचे

जे माणूस,माणुसकीलाच विसरवते

माय बाप हो,-----


  व्यसनांध बनून स्वतःचा,कुटुंबाचा ऱ्हास करू नका

व्यसनाच्या आहारी जाऊन स्वत्व सोडू नका

व्यसन करेल तुम्हाला स्वतःपासून लांब

व्यसन करेल तुम्हाला जीवनापासूनही लांब


व्यसनाला होईल का कधी शासन?

व्यसनाने मिळेल का सात्विक जीवन?

व्यसनामुळे मिळेल का गेलेले माणूसपण?

व्यसन मिळवून देईल काहो आपलेपण?


व्यसन असावे शिक्षणाचे

व्यसन असावे देशप्रेमाचे

व्यसन असावे प्रगतीचे

व्यसन असावे स्वच्छ तेचे।


घ्या झाडू ,झाडून टाका स्वैराचार

घ्या झाडू झाडून टाका भ्रष्टाचार

घ्या झाडू झाडून टाका आळस

पडदा स्वार्थाचा झाडून व्हा डोळस------


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy