व्यक्ती तसा चांगला होता....
व्यक्ती तसा चांगला होता....
व्यक्ती चांगला होता......
कोण होता तो ,, व्यक्ती चांगला होता......
जिवंत असताना नाहीं दिला कोणी साथ,
मेल्या वर दिला मतलबी अश्रू चा भास,,
या मतलबी जगात फक्त मतलबी बोली,
भूतकाळा कडून धडा नेहमी शिकतच राहील...|| ध्रु ||...
व्यक्ती चांगला होता....
होता तेव्हा चार शब्द नीट नाही बोलला
मेल्या वर स्तुतीचा मोठा डोंगर उभारला
जिवंत असताना माझ्याकडे लक्ष नाहीं दिले
मेल्या वर मी शांत झोपलो होतो त्यांनी
माझ्या प्रेताला मोठ्या मायेने सजवले
किंमत का नेहमी मेल्यावरच करावी ...||१|
व्यक्ती चांगला होता.....
जिवंत असताना चार पाऊल सुद्धा सोबत चालत नाही
मेल्यावर किती तरी दूर खांद्या वर घेवून चालतच राही
व्यक्ती जिवंत असतानाच त्याची किंमत करावी
मेल्या वर तर परका सुद्धा म्हणतो
व्यक्ती तसा चांगला होता ...||२||....
