वसुंधरा
वसुंधरा
हिरवीगार सौंदर्याने नटलेली
हवहवीशी वाटते ही वसुंधरा |
पर्वतरांगा, विस्तीर्ण निळे आकाश
फेसाळ लाटा येता भरती समुंदरा | |१| |
वृक्षलतां फुलांवर फुलपाखरं सुंदर
संगे पाखरं गाती मंजूळ गाणी |
दऱ्याखोऱ्यातनं झुळझुळणाऱ्या
नद्या निर्झरांचे नितळ पाणी | |२| |
वसुंधरेचे सौंदर्य सारे मनापासून
आपणच जपायला आहे हवे |
थांबवून वृक्षतोड, प्रदूषण नियंत्रण
वृक्ष लागवड उपाय योजून नवे | |३| |
