वसुंधरा
वसुंधरा
वसुंधरा
वाचवा सारे,
करु आपण रक्षण
बांधवांनो करु सारे वृक्षारोपण.
वसुंधरा
वाचवू आपण,
करु सारे जतन
थांबवा रे भावांनो आता प्रदूषण.
वसुंधरा
आपली माता,
आपण तीची लेकरे
टिकवू वसुंधरेला साथी रे.
वसुंधरा
सजली खरी,
चिंब भिजून पावसात
आनंदाने नाचू गाऊ गित.
वसुंधरा
सुजलाम् सुफलाम्
पावन मातेला नमन
रक्षण करु देऊनी प्राण.
