वसुंधरा
वसुंधरा
दूषित, मळकी
झाली काया
लावू वसुंधरेला
थोडी माया
सर्वस्व आपल्याला
अर्पण केले
आपण मात्र
हरितहीन केले
दुखावले गेले
तिचे मन
आता तरी
करू पण
वेळ झाली
जागे होण्याची
आपल्या धरतीला
परत सावरण्याची
तिचे उपकार
नको विसरायला
पुढे येऊ
तिला सांभाळायला
बदलू थोडी
आपली वागणूक
नव्याने करू
वसुंधरेची जपणूक
देवून तिला
हिरवीगार नवलाई
झाडे लावत
गाऊ अंगाई
