वसंताचं रिमिक्स
वसंताचं रिमिक्स


वसंतातच लागली पिवळाई
अन गळणं शिशिरऋतूचं
विचारावं कुणाला ,कसं अन का?
पुसावं रुजवणाऱ्या,वाढवणाऱ्या
धरेला की तापणाऱ्या रवीला?
कोपला वसंत ? की ....
स्वीकारलं त्यानेही रिमिक्स
ऋतूला अवेळी अंकुरण्याचं.....
त्यासवे दिखावू पक्वतेचं
किळसवाणं ,बिभत्स.....?
वसंतही कदाचित झाला आधुनिक
मुखवटा चढवणारा....फसवा
फुलणं फुलवणं विसरणारा....
बेगडी.....अनावृत्त...
सरावलेला.... घोटाळा स्वीकारणारा.....!