STORYMIRROR

Rohini Paradkar

Comedy

3  

Rohini Paradkar

Comedy

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
822

बदलले ऋतू चक्र घेऊनी 

ही उबदार गुलाबी थंडी  

सकाळी गरम ऊन 

रात्री चा हा सुखद गारवा 

मनी जागवी उबदार भावना 

बोचर्‍या थंडीत पेटती शेकोटी 

येतो गप्पा टप्पांना उत 

धुक्याची शाल लपेटून डोंगर - दऱ्या 

 पहाटेचे ते धुक्यातील गवतावरील 

दवबिंदू भासे मोती सम

नववर्षातील गोड बोलून 

साजरी होती मकरसंक्रांत 

त्यात रंगते हुरडा पार्टी 

शिशिर ऋतू चा फुलतो काटा

 तिळ गुळाच्या दाण्यावर  

जाग येई पर बाजू न 

होई रजई उबदार अशी 

ही साखर निद्रा छान 

दिवस होई लहान 

रात्र ही मोठी 

स्वेटर्स कानटोपी घालूनी 

मस्त ही गुलाबी थंडी 

मावळतीचा सूर्य लपेटतो 

शीतलतेचा गारवा 

रात्री चे हे धुके लाजत 

शिरते कुशीत डोंगरांच्या 

कुड्कुडना-या थंडीत मिळे 

शेकोटी चा उबदार पणा 

दाट पांघरलेले धुके 

दवबिंदूची आसवे 

लाडीक चाळे करत 

गुलाबी ही थंडी आली 

हुडहुडी भरली 

उडाली माझी दांडी 

मिठीत घेत म्हणाली 

मी आहे ही गुलाबी थंडी 

पिता चहा कडक आल्याचा 

पळाली ही थंडी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy