वृक्षमंदीर.. एक यज्ञ
वृक्षमंदीर.. एक यज्ञ
ओसाड टेकडीवर नंदन वन फुलवण्या अखंड आम्ही झटतो
वृक्षमंदीर टेकडीवर साकारण्यायज्ञ आम्ही करतो
येती कित्येक संकटे अन् विपदा किती परी नच आम्ही डगमगतो,
"याल तर सह नाही तर विना!" म्हणत समिधा कष्टाच्या अर्पण करतो
वाळूमधून तेल काढण्याचा प्रयत्न कधी आम्ही करतो
कधी वेडे कधी रिकामटेकडे अशा टीकेचे धनी देखील ठरतो.
कॅनरुपी घड्यात भरुन जीवन जीवनास ते अर्पितो
जीवनाने त्या धरेतून नव - अंकूर मग जन्म घेतो
नव - अंकुरासह नवजीवनाचा आनंद आम्ही जेव्हा लुटतो
"जीवो जीवस्य जीवनम्.!" मंत्राचा जाप यथार्थ ठरतो
