शक्ती
शक्ती
देवादी देव महादेव मिरवतो चंद्र भाळी अन् गंगा शिरी,
आदिमाया मी.. मी भवानी दुर्गा मी असुरांसी संहारी ||
तिमिर नाशून प्रकाश पेरण्या, पेलते मी भास्करा माथ्यावरी
नच होते मी दीन, न आहे अबला सबला असे मी आजची नारी ||
