STORYMIRROR

Mahendra Bagul

Inspirational

3  

Mahendra Bagul

Inspirational

कृतार्थ.. आई

कृतार्थ.. आई

1 min
282

जीवन तुझे सार्थ आई जीवन तुझे सार्थ,केवळ परमार्थ- न कुठला दिसला स्वार्थ |समजून घेताना लेकीला... जीवनाचा तुझ्या अर्थ ||

खेडेगावातली तू कन्या होतीस अवखळ |चार यत्ते पुढे शिकण्यासाठी चे नाही मिळाले तुला बळ ||

रूढी पंरंपरांच्या ओझ्याखाली मात्र गेलीस गं दबून |अल्लडपण ते बालपणीचे, पुरते गेले कोमेजून ||

खटल्याच्या छोट्या घरात गिरवलेस प्रपंचाचे धडे |वाटचाल करीत पुढे - सांभाळली, मायेने सारी भावंडे ||

साथ खंबीर मात्र मिळाली, आनंदी, सज्जन बाबांची |एकत्र कुटूंबात राहीलीस सावली बनून त्यांची ||

नोकरचाकर ,गाड्या, घोडे यांचा कधी हव्यास नाही तू केला |कुटंब ,संसार, मुलेबाळे ध्येय आयुष्याचे मानत, झोकून दिलेस स्वतः ला ||

 लेकरांच्या शिक्षणाला दिलेस अपार महत्त्व , त्यागून तू स्वत्व.. | आले कित्येक खडतर प्रसंग, खंबीरपणाने लढलीस , जपत स्वत: चे तत्व ||

 संयम , काटकसर , त्याग तरअलंकाराप्रमाणे तुलाच शोभत |आत्मप्रौढी ,फूशारकी तर, वाटेस ही तुझ्या जात नसत !!

नीटनेटकेपणा ,स्वच्छता अन कलाकुसरी तर अंगात तुझ्या भिनलेल्या, |कशा मी विसरू नाजूक, सुंदर..  बनवलेल्या तू बाहूल्या सानुल्या ||

उबदार ते स्वेटर्स अन टोप्या, मायेच्या धाग्याने विणलेल्या.. |चटकदार ते कैरीचे लोणचे अन खुसखुशीत त्या साटोऱ्या-चकल्या.. ||

कशा गं विसरु अन्नपुर्णे मीत्या पापड कुरडया अन सुग्रास पुरणपोळ्या, अनेक जेवणावळ्यां पंक्तीत आग्रहाने तू वाढलेल्या. ||

न बोलताही शिस्त लावणे, कसे गं आई तुला साधले? अन विद्येवरतीच प्रेम करावे, आम्हा मुलांवर चपखल बिंबवले ||

अविरत जे तू कष्ट उपसले, महत्त्व श्रमप्रतिषठेला दिले |मुले आम्ही उच्च विद्याविभूषित.. केवळ आई त्यामुळेच घडले ||

साधी रहाणी - उच्च विचारसरणी, ह्या विचाराची पुरस्कर्ती |अबोल प्रेम अन् निर्व्याज कर्माची हळव्या मनाची साक्षात तू मूर्ती... ||

यशस्वी तुझ्या ह्या जीवन प्रवासात, चालू शकलो तुझ्या पाठी संगती |तूच गे सदैव राहिलीस, होऊन आमची सांगाती ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational