STORYMIRROR

Mahendra Bagul

Abstract

3  

Mahendra Bagul

Abstract

माझी कविता

माझी कविता

1 min
267

कधी मनातली साठवण, 

कुणाची तरी आठवण

कधी दुखाला आवतण

कधी सुखाची भलावण.. 

 माझी कविता ||


कधी डोळ्यांनी पाहणे 

आणि मनाने भाळणे 

कधी प्रेमात पडणे 

आणि दिलाने झुरणे.. 

माझी कविता ||


कधी आभाळाची माया 

कधी वटवृक्षाची छाया 

कधी धरणीची काया 

कधी पंढरीचा राया.. 

माझी कविता ||


कधी आकाशाची निळाई 

कधी सागराची गहराई 

कधी सावळी विठाई 

कधी मायेची अंगाई.. 

माझी कविता ||


कधी मिलनाची आस 

कधी विरह उदास 

कधी केवळ आभास 

कधी सारेच भकास. 

माझी कविता 


कधी मनाची कल्पना 

कधी प्रितीची प्रेरणा 

कधी शब्दांची वंदना 

कधी मनातील वेदना... 

माझी कविता ||


दिसतील अशा अनेक खुणा 

शब्दांना जेथे नाही कधी मना 

जपत माय मराठीचा बाणा 

सरस्वती उपासनेत ताठ राहील कणा 

माझी कविता ||


 ही माझी घोर.. 

कवि मनाची साधना.. 

म्हणजे 

माझी कविता ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract