STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Tragedy

4  

Urmi Hemashree Gharat

Tragedy

वृध्दाश्रम वाढतायं

वृध्दाश्रम वाढतायं

1 min
342

हाताचा पाळणा करुन वाढवते

लेकुरवाळी माय माऊली 

स्वत:च्या इच्छा मारुन

बाप लेकरांसाठी होतो सावली


बालपणी हट्ट पुरवितो

शाळेत ने आण करतो

वेळ पडली तर

स्वत: उपाशी राहतो


जशी लेकरे वाढतात

नवविश्वात लगेच रमतात

सहचारिणीसह नव्याने संसार थाटतात

आई वडील अडगळ वाटु लागतात


लहानपणी जे बोट पकडुन

शाळेला फिरायला जायचा

त्याच थरथरत्या हाताला कातरवेळी

वृध्दाश्रमाचा रस्ता दावतात


कटु असलं तरी

गल्लीपासुन दिल्लीपर्यत

हल्ली वृध्दाश्रम नवी नवी वाढतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy