वृद्धत्व
वृद्धत्व
अपमानास्पद वागणुकीने कंटाळला घरचा ज्येष्ठ
शाप आहे की वरदान न कळेना असे त्याचे वृद्धत्व
शारीरिक व्याधींनी जीर्ण झाली काया
त्यासंगे असह्य वाटते ही मनाची कुचंबणा
कुटुंबाकडून होणारी हेटाळणी कशी बशी झेलतो
असुरक्षिततेची जाणीव होता चार अश्रू गाळतो
सेवानिवृत्तीनंतर होते त्याची आर्थिक विवंचना
मुलांनी शेवटी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला
माणूसकी ओशाळली आजच्या या स्वार्थी जगात
ज्येष्ठ नागरिकाविषयी प्रेमभावना नाही राहिली मनात
म्हातारपण हे दुसरं बालपण असत कळत नाही लोकांना
वृद्धत्व सुखाचा असावा त्यात दुःखाचा लवलेशही नसावा
