वृद्धापकाळात हवे सुख...
वृद्धापकाळात हवे सुख...


उद्याचा भक्कम आधार परका होई जेव्हा
वृद्धापकाळातील एकटेपणाच्या यातना
भोगाव्या लागतात नकळत अशा वेदना
तेव्हा नाही उरत जगण्याचीही वासना
आपलाच जन्म जणू अभाग्यासारखा
किती भयानक ही आयुष्याची दुरावस्था
सुखावेळी वृद्धाश्रमाची फाटकी झोळी
कशी ठेवावी कुणा आपुलकीची आस्था
अवस्था उद्याची यापेक्षा वेगळी नसेल
म्हणुनी लेकरांनी वेळीच सत्यता जाणावी
येणाऱ्या पिढीसमोर नात्याची व्याख्या
आपल्या आदर्श वागणुकीतून बदलावी
आपल्या घडण्यामागचा खंबीर पाठिंबा
जाणून आई-वडिलांचे अपार दुःख
होऊन म्हातारपणातली विश्वासू काठी
कुटुंबासमवेत एकत्र राहण्यात खरे सुख