वनवाशी
वनवाशी
आयुष्यात माझ्या l नाही मज कोण l
देवा तुजवीण l उरलेले ll
मागे पुढे तूच l पाठीराखा माझा l
आधार हा तुझा l देवा मज ll
भ्रमात जगलो l देवा इथं मी रे l
नाही कोणीच रे l माझेइ थे ll
आपुले मानले l ज्यासी इथं देवा l
त्यांनीच का घ्यावा l घात माझा ll
जग नाही देवा l नाही इथं माझं l
लेकरू मी तुझं l एकटं रे ll
संभाळ मजला l हिच विनवणी l
हात मी जोडोनी l मागतो रे ll
देवा ऐक आता l ऐकून घे माझं l
लेकरू मी तुझं l वनवाशी ll
