वळणावर त्या...
वळणावर त्या...
वळणावर त्या...
तुझी वाट आजही आहे
तुझे माझ्या आयुष्यात असणे
माझ्यासाठी खास आहे...!
वळणावर त्या...
तुझी बोचरी आठवण आहे
तुझे सोबतीला असणे
रवी किरणांची संगत आहे...!
वळणावर त्या...
खळखळत वाहणारा झरा आहे
चंचल वाऱ्यासोबत मला
कोमल मनाची साथ आहे...!
वळणावर त्या...
तुझे निखळ हास्य आहे
विरहात तुझ्या असूनही
तुझ्यावर जीव लावणे आहे...!
