विविधता राज्याची
विविधता राज्याची
गड किल्ले सांगती
महती महाराष्ट्राची
सोन्याहूनी असे सुंदर
संस्कृती अपुल्या महाराष्ट्राची ।।1।।
पाहुण्यास आदर देणे
हिच असे संस्कृती अमुची
नटलेला निसर्ग चहुकडे
हिच ओळख अमुच्या संस्कृतीची ।।2।।
सण-उत्सव नाही तोटा
जपतो आमुची मानाने
परंपरा हेची कायम
आहे अभिमान आम्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ।।3।।