Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

4.5  

Sangita Pawar

Inspirational

विषय :-" रक्षाबंधन "

विषय :-" रक्षाबंधन "

1 min
295


भारतीय संस्कृतीत

संयमाचा असे संयोग

बहीण -भावाच्या प्रेमाचा

रक्षाबंधन असे योग ||


सण असे हा परिवर्तनाचा

बदले भावाच्या दृष्टीचा

बहिणीच्या रक्षणाचा

 नियम असे सर्व सृष्टीचा||


विश्वासाचे घडते दर्शन

बहीण भाळी टिळा लावे

राखी बांधून भावाला

मनोकामना करी भावे ||


बांधूनी धागा विश्वासाचा

विसरू नको बहिणीला

औक्षवंत हो भाऊराया

हीच कामना ईश्वराला ||


संदेश असे रक्षाबंधनाचा

स्त्री प्रती पवित्र दृष्टीचा

विकृती दृष्टी संपवण्याचा

भ्रूणहत्या थांबवण्याचा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational