STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

विषय:- निखळ हास्य

विषय:- निखळ हास्य

1 min
1.1K

चेहऱ्यावरचं मनमुराद

निखळ हास्यच हरवलंय |

चेह-यावर बेगडी हसू

सर्वाच्या ओठांनी लपवलंय | |१| |


लहानग्यांच्या चेह-यावरही

दिसत नाही निरागस हसू |

विसरलेत सारे मायेचे स्पर्श

मोबाईलशी लागले खेळत बसू | |२ | |


दिसले समोर ओळखीचे तरी

हेतू पुरस्कर कानाडोळा करती |

झालीच नजरानजर चुकून तर

मुखावर मुखवटा हलकेच धरती | |३| |


अशा या बनावटी जगात जो तो 

वावरतो जरा सावध होऊन |

आपापल्यापरीने चाकोरीबद्ध

संसारात घेतो खुशाल पोहून | |४ | |


हल्ली निखळ, निर्व्याज, निरागस हास्य फक्त बालकांच्यात दिसतं. मोठी माणसे तर तसं हसणंच विसरत चालली आहेत. लहान मुलांना पण आपण त्या हास्या पासून दूर करतोय त्यांना नको तितक्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे आपण बंदिस्त करून टाकले आहे हेच या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract