विसरू नको
विसरू नको
पंजा गेला आजा गेला बाप ही गेला
हे विसरू नको माणूस म्हणून जन्माला आला
माणूसकी कधी विसरू नकोस I
मुलगा झाला.नातू होईल पणतू ही होईल
जन्माला आला तो ही एक दिवस जाईल
हेही तू विसरू नको माणूस म्हणून
जन्माला आला माणुसकीला कधीही विसरू नको.
वर्ष गेली महिने गेले दिवसही जातील
काही तास शिल्लक राहतील
हे तू विसरू नको माणूस म्हणून जन्माला आला
माणुसकीला कधीही तू विसरू नको
क्षणभंगुर काळ हा क्षणभंगुर क्षण
हे कधी संपतील हे काळाला हि न कळले
म्हणून जन्माला आला माणूसकीला तू विसरू नको
