STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Tragedy

3  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Tragedy

विसरू नको

विसरू नको

1 min
346

 आजा गेला पंजा गेला बाप ही गेला हे विसरू नको माणूस म्हणून जन्माला आला माणूसकी कधी विसरू नकोस I 

मुलगा झाला. नातू होईल पणतू ही होईल जन्माला आला तो ही एक दिवस जाईल हेही तू विसरू नको माणूस म्हणून जन्माला आला माणुसकीला कधीही विसरू नको. I

 वर्ष गेली महिने गेले दिवसही जातील काही तास शिल्लक राहतील हे तू विसरू नको Iमाणूस म्हणून जन्माला आला माणुसकीला कधीही तू विसरू नको I

क्षणभंगुर काळ हा क्षणभंगुर क्षण हे कधी संपतील हे काळाला हि न कळले म्हणून जन्माला आला माणुसकीला तू विसरू नकोI

दसरा गेला दिवाळी ही जाईल ओवाळीही जाईल आले सण गेले सण सर्व काही जातील पण परंपरा संस्कृती तू विसरू नको काळाला धरून चाल माणुसकी तू विसरू नकोI


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract