STORYMIRROR

Shobha Wagle

Abstract Fantasy Inspirational

3  

Shobha Wagle

Abstract Fantasy Inspirational

विश्वनिर्माता

विश्वनिर्माता

1 min
165

विश्वनिर्माता तूच एक विद्याता

वास्तव तुझे सृष्टीच्या चराचरात

प्रत्यक्ष नाहीच तू दिसत कुणाला

पण चैतन्य जाणवे कणाकणात.


कलाकृती तू निर्मिली छान विश्वावर

उंच पर्वत,नदी नाले वाहती शुभ्र झरे

हिरवे हिरवे रान शेत चौफेर भरले

तुझेच अस्तित्व जाणवते मज खरे.


कालचक्र हे ऋतूचे साऱ्या जगतावर

पशू,पक्षी,प्राणीमात्रांना हर्षवित असते

इंद्रधनुष्याची कलाकृती ती नभांगणी

तुझ्याच कुंचल्याची करामत ती वाटते.


तूज काय म्हणू मी शिल्पकार, कलाकार,

निर्गुण,निराकार, की अजब जादूगार!

कधी अघटीत होत्याचे नव्हते ते करतो

तर कधी नवलाईचे घडवितो चमत्कार.


अनंत नावे असलेला तू एकच विद्याता

राम -कृष्ण,अल्ला- रहीम येशू, ईश्वर 

संपूर्ण विश्वाचा तूच एक कर्ता करविता

अस्तित्व तुझे जाणवत असते निरंतर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract