STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

विश्वास (सहाक्षरी)

विश्वास (सहाक्षरी)

1 min
168

तोडायचा नाही

जोडून घ्यायचा

विश्वास आपला

असा राखायचा


कामे ती होतात

याच विश्वासाने

असाध्य ते साध्य

केलेय हो त्याने


साम्राज्य स्थापन

केलेत त्यानेच

रंकाचे राव ही

झालेत यानेच


घरात बाहेर

त्याचा बोलबाला

तडा न जावाच

कधी विश्वासाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational