विसावा
विसावा
सारे असूनही
त्यात मौज नाही
मित्रा तुझ्याशिवाय
सारे आयुष्य गौण आहे
यावे फिरून पुन्हा
ते बालपण....
शालेय जीवन
पुन्हा वाजवी घंटा
पुन्हा भरावा वर्ग
फिरुनी यावे पुन्हा
सर्व गेलेले दिवस ते
रुसवा-फुगवी ती
अन् भांडा-भांडी
आता पावलो पावली
परीक्षा देत आहे..
पास की नापास माहित नाही...
आयुष्य मात्र फक्त दौडत आहे
वाटते जीवास मिळावा
कुठे तरी विसावा...
त्यासाठी एक तरी
सच्या मित्र असावा...
त्यासाठी एक तरी
सच्या मित्र असावा...
