STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance Tragedy

3  

Sushama Gangulwar

Romance Tragedy

विरह

विरह

1 min
257

कशी सहन करू विरह 

तुझे मी वीर जवानां

किती दिवस एकटीच काढू 

सांग ना रे तुझ्या विना.......


भूमातेच रक्षण तुझ्या हाती 

आहे मला याची जाणीव 

पण कधी कधी तुझ्या प्रेमाची 

मला ही भासते रे उणीव........


आठवणीत तुझ्या मी 

डोळ्यातून आश्रू गाळते 

घरातील प्रत्येकाला डोळ्यात 

कचरा गेला असे मी सांगते......


अचानक मन माझे 

कधी कधी बेचैन होते 

तू कसा असशील याची

चिंता ही मला रोज वाटते.......


तुझ्या मिलनाची सख्या 

मी आतुरतेने वाट पाहते 

तुझ्या विरहात कित्येक रात्र 

अशीच मी जागून काढते.......


तुझे प्रेम जसे मातृभूमीवर 

तसे माझे प्रेम तुझ्यावर रे 

कधीतरी ऐकुनी साद माझे 

ये धावून भेटण्यास रे.........


जसा भूमातेचा लेकरू तू 

निजतो तिच्या कुशीत रे 

तसाच प्रेमाने घे एकदा मला  

सख्या तुझ्या मिठीत रे........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance