STORYMIRROR

Smita Murali

Romance

4  

Smita Murali

Romance

विरह

विरह

1 min
363

विरह


लग्नगाठ बांधली सख्याशी

सोडले तेंव्हा गावाची शीव 

संसार जोडीने करता करता

सख्यावर जडला माझा जीव


संसाराच्या सारीपाठावर सदा

तुझ्या सहवासाचा मनी ध्यास 

तुझी सावली बनून जगावे वाटे

तू बनला सख्या माझा श्वास


नको वाटतो रे दुरावा कधीही

तुझा विरह मला खूप छळतो 

तुझी वाट पाहता पाहता सख्या

माझा जीव क्षणाक्षणाला जळतो


नको जावूस दूर सोडून मजला

नको कधीही तुझ्या माझ्यात दुरावा

नको विरहाचे गाणे या ओठी

विरहाचा हा ऋतू जरा दूर सरावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance