विरह
विरह
जीवन जगताना, जीवन जगताना
कुणी दिसतो हसताना
कुणी दिसतो रडताना
तुझ्या विरहाचे दु:ख घेऊन
मी दिसेल फिरताना
जीवन जगताना, जीवन जगताना
सोडून घरटे पक्षी जाती
चोची मध्ये दाणा घेऊन माघारी येती
तुझ्या स्मृतींचे मेघ जमुनी
डोळ्यांमधूनी सतत वाहती
जीवन जगताना, जीवन जगताना
दुर कुठे मंदिरातील
ऐकू येतो गजर
तुला शोधीत फिरेल
माझी व्याकुळ नजर
जीवन जगताना, जीवन जगताना
कधी असा काळ येईल?
जशी सागरात दोन कासवाची होते
तशी आपली भेट होईल?
जीवन जगताना, जीवन जगताना
विरह वेदना असह्य होऊन
तुज पासून मज जाईल घेऊन
रडले जरी कोणी कितीही
विरह दु:ख तुला जाईल देऊन
जीवन जगताना, जीवन जगताना
फक्त एक काम कर
प्राण माझे जाताना
माझा हात तुझ्या हातात धर

