विळखा
विळखा
कोरोनाचा कहर जगी
बघता बघता पसरला
जग विषाणूच्या विळख्यात
पुरता आज अडकला
संचारबंदी जागोजागी
देशामध्ये लागली
सुने रस्ते, गल्ल्या सुन्या
भेसूर वाटू लागली
पिंजरा झाला घराचा
लक्ष्मणरेषा तो उंबरठा
प्राण घेण्या उभा रावण
शत्रू जीवाचा मोठा
रूप पालटले सृष्टीचे
ग्रहण असे लावले
हसत्या खेळत्या मानवाला
स्मशानात पोहोचवले
हिंमत करुनी देऊ लढा
आता हरवू कोरोनाला
नियम सारे पाळू आपण
वाचवू धरणीमातेला