STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Tragedy

4  

Sonali Butley-bansal

Tragedy

विखुरलेली पाने

विखुरलेली पाने

1 min
385

डायरीच्या पानापानावर साचलेले असतात कालबाह्य अन कालातीत क्षण ,रोजच्या नोंदी ,

पानापानात ठेवलेली कात्रणं ,अन् पाना फुलांची हर्बेरिअम...


 या सर्वांतून स्वतः स्वतः शी जपलेलं नातं आणी केलेलं हितगुज ...


वाऱ्याच्या वेगाने येतात जगण्याच्या उर्मी

थोपवता येतच नाहीत कितीही ठरवलं तरीही

निवांतपणा निसटून जातो उरतं फक्त यंत्रवत जगणं...


फडफडणारी डायरीची पानं आणि आठवणीही विखूरतात अन इतस्ततः पसरतात

 गोळा करायला जावं तर पानांचे तुकडे होण्याची भीती ...


आरामात झोपून वाचण्यासाठी ठेवलेल्या दिवाणावर

कधी साधी सतरंजीही पसरता आली नाही की खिडक्यांना झिरमिरणारे पडदे ही लावता

आले नाही याचेच वैषम्य वाटत रहाते...

याचेच वैषम्य वाटत रहाते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy