STORYMIRROR

Jyoti gosavi

Abstract

3  

Jyoti gosavi

Abstract

विकेण्ड ची पार्टी

विकेण्ड ची पार्टी

1 min
157

विकेण्ड ची पार्टी

 आली रंगात 

अंगविक्षेप करून सारे

 नाचू लागले ढंगात

 हातात बिअरच्या बाटल्या


 ओठांवर सिगारेट 

 कोणीही कोणाच्याही कमरेला

 विळखा घातलेला थेट 


डीजे च्या तालावरती

 घुसळून अंगाशी अंग

 मदहोश नजरेत 

नाचण्याचा भरला रंग 


कोण कोणाचा नवरा 

आणि कोण कोणाची बायको

 दारू मटण चिकन सिगारेट

 सारेच झालेत सायको


 कामाचा शीण घालवण्यासाठी

 म्हणे वागावे लागते असे

 नाही शिरलात कळपात

 तर होईल तुमचे हसे


फक्त तुम्हालाच असतो

 का? कामाचा स्ट्रेस

 बाकीच्यांनाही करावे लागतात

 सेम प्रॉब्लेम फेस 


सोबत आणलेली लेकरे

 आता विसरतील शुभंकरोती

 त्यांनाही असेच वाटेल की

 हीच आपली संस्कृती


 मुले करतात नेहमीच

 मोठ्यांचे अनुकरण

 आपल्या संस्कृतीचे आपणच 

ओढवून आणलय मरण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract