Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

विजयादशमी

विजयादशमी

1 min
421


नऊ रंगाची उधळण करीत

आला नवत्सवाची नवरात्र

दुर्गामातेच्या मंगल पूजनाने

 घालुनी जागरण जागवी रात्र||


मासअश्विन शुद्ध दशमीचा

सण असे पवित्र दसऱ्याचा

म्हणती त्याला विजयादशमी

मनामनात असे आपुलकीचा ||


आला दसरा, आला दसरा

विचाराचे करू सीमोल्लंघन

लुटुया सोने प्रेमाने वआनंदाने

वाईट विचारांचे करू उल्लंघन||


सरस्वती पूजनाचा असे थाट

उद्घाटन सोहळाही मोठा

गोड पक्वानाचा सण असा

झेंडूच्या फुलांना मान मोठा ||


दिन आज सोनियाचा

शस्त्रास्त्र शमीपूजनाचा

उधळण करू सोन्याची

नाती जपू प्रेमाची मना ||


विसरून द्वेष मनामनातील

मनी सर्वांच्या आपुलकीची 

गुण्यागोविंदाने राहू सगळे

हीच पर्वणी असे दसऱ्याची ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational