STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

वीर स्वयंप्रकाशी

वीर स्वयंप्रकाशी

1 min
177

एक होता तरून मुसाफिर!

तृष्णेने व्याकूळ अन् अधीर!!

पणाला लागला त्याचा धीर!

गेला होऊनी खरा वेडा पीर!!


दाही दिशा करी फीर फीर!

कुठेच मिळेना नदीचा तीर!!

हाडांचा अस्सल होता वीर!

ठेवून शांत आपलेच ते शीर!!


भात्यातला सोडला एक तीर!

एका हाताची ताणून ती शीर!!

उभ्या कातळा पडलीच चीर!

पोटभर प्यायला निर्मळ नीर!!


जवळी होता विवेक नीरक्षीर!

मिळाली न खावया जरी खीर!!

नको मिळाया विश्रांतीच चीर!

राहिलच कसा तो अनाम वीर!!

जयासी मरणाची नसेच फीकीर!

स्वयंप्रकाशित असतानाही तिमीर।!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational